LSG vs CSK Weather Update: CSK फॅन्सला मोठा धक्का! LSG vs CSK सामना रद्द होणार, मोठं कारण आलं समोर

Lucknow Weather Updates : आज लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत
LSG  vs CSK
LSG vs CSK Saam tv

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत आज रोमांचक सामना पार पडणार आहे. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजी करण्यासाठी सर्वात कठीण मानली जाते.

लखनऊ सुपर जायंट्स संघाने आपल्या घरच्या मैदानावर दोन सामने गमावले आहेत. तर केएल राहुल देखील दुखापतग्रस्त आहे. त्याची फिटनेस लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी चिंतेचा विषय असणार आहे. दरम्यान आजच्या सामन्यात कसे असेल लखनऊचे हवामान? जाणून घ्या. (LSG vs CSK Weather Update)

LSG  vs CSK
IPL 2023 MI vs RR Match: IPL च्या १६ वर्षांच्या इतिहासात '३० एप्रिल' ही तारीख नेहमी लक्षात ठेवली जाईल, वाचा नेमकं काय घडलं?

चेन्नई करणार कमबॅक?

जोरदार फॉर्ममध्ये असलेला चेन्नई सुपर किंग्ज संघाला गेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात चेन्नईचा संघ जोरदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

गेल्या सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि डेवोन कॉनव्हेने चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र चेन्नईचे गोलंदाज चांगली कामगिरी करण्यात आज अपयशी ठरले होते. या कामगिरीनंतर एमएस धोनी निराश झाल्याचे पाहायला मिळाले होते.

जर चेन्नईला हा सामना जिंकायचा असेल चेन्नईच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. (Latest sports updates)

LSG  vs CSK
Who Is Naveen Ul Haq: Virat सोबत पंगा घेणारा अवघ्या २३ वर्षांचा Naveen आहे तरी कोण? यापूर्वी देखील मैदानात केलाय राडा..

कसे असेल लखनऊचे हवामान? (Lucknow Weather Today)

लखनऊमध्ये आज ढगाळ वातावरण असू शकते. लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना दुपारी ३:३० वाजता सुरू होईल. यावेळी तापमान २७ ते ३२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. सामन्या दरम्यान पावसाची शक्यता ३८ टक्के असणार आहे.

LSG  vs CSK
CSK vs PBKS IPL Match Result: शेवटच्या षटकात फिरला सामना; रोमहर्षक सामन्यात पंजाबची चेन्नईवर मात

अशी असू शकते प्लेइंग 11 (LSG vs CSK Playing 11)

लखनऊ सुपर जायंट्स ( LSG Playing 11)

केएल राहुल (कर्णधार), काईल मेयर्स, आयुष बदोनी, मार्कस स्टोइनिस, निकोलस पुरन (यष्टिरक्षक), दीपक हुड्डा, कृणाल पंड्या, नवीन उल हक, रवी बिश्नोई, आवेश खान, यश ठाकूर

चेन्नई सुपर किंग्ज (CSK Playing 11)

ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉनव्हे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मथीशा पथिराना, तुषार देशपांडे, महेश थिक्षणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com