Suryakumar Yadav Memes: 'तुमचा नादच लई डेंजर,आमचा सूर्या हो गेम चेंजर' तुफानी खेळीनंतर सोशल मीडियावर भन्नाट memes व्हायरल

Suryakumar Yadav: या खेळीनंतर सोशल मीडियावर मिम्सचा महापूर आल्याचे पाहायला मिळाले आहे.
suryakumar yadav memes
suryakumar yadav memes twitter

MI vs GT, IPL 2023: वानखेडेच्या मैदानावर शुक्रवारी हाय व्होल्टेज सामना पार पडला. हा सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना पैसा वसूल सामना पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्स विरुध्द गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या सामन्यात मुंबईने जोरदार कामगिरी करत २७ धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात चर्चेत राहिला तो मिस्टर ३६० म्हणून ओळखला जाणारा सूर्यकुमार यादव. त्याने गुजरातच्या एकूण एकूण एक गोलंदाजाचा चांगलाच समचार घेतला. त्याने ४९ चेंडूंचा सामना करत आयपीएल कारकिर्दीतील पहिलेच शतक झळकावले.

दरम्यान या खेळीनंतर सोशल मीडियावर मिम्सचा महापूर आल्याचे पाहायला मिळाले आहे.

suryakumar yadav memes
IPL 2023 : रोहित शर्मासाठी 'करो या मरो'ची लढाई; मुंबई इंडियन्स मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मुंबईकडून वन मॅन शो फलंदाजी...

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाची सलामी जोडी लवकर माघारी परतली होती. त्यावेळी सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला. त्याने सुरुवातीला संथ गतीने फलंदाजी केली. त्यानंतर जे त्याने फटकेबाजी करायला सुरुवात केली, ती शेवटच्या चेंडूपर्यंत सुरूच ठेवली. २० व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने आपले आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याच्या खेळीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ४९ चेंडूंचा सामना करत नाबाद १०३ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ११ चौकार आणि ६ षटकार मारले. (Latest sports updates )

सूर्याच्या खेळीनंतर भन्नाट मिम्स व्हायरल...

राशिद खानची खेळी व्यर्थ..

या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक १०३ धावांची खेळी केली.

तर सलामीला आलेल्या ईशान किशनने ३१, विष्णू विनोदने ३० आणि रोहित शर्माने २९ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने २० षटक अखेर ५ गडी बाद २१८ धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाकडून राशिद खानने अप्रतिम फलंदाजी करत ७९ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ३ चौकार आणि १० षटकार मारले. तर डेव्हिड मिलरने ४१ धावांचे योगदान दिले.

विजय शंकरने २९ धावांची खेळी केली. मात्र गुजरातचा संघ विजयापासून २७ धावा दूर राहिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com