
Social Media: सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होईल आणि तो चर्चेत येईल हे सांगता येत नाही. आतापर्यंत तुम्ही भररस्त्यात भांडणाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. या भांडणामध्ये एखादी व्यक्ती मिळेल त्या वस्तूने समोरच्या व्यक्तीला मारहाण केल्याचे तुम्ही पाहिले असेल. पण जर तुम्हाला कोणी सापाचा चाबूक म्हणून वापर करुन कोणाला मारहाण केल्याचे सांगितले तर विश्वास बसणार नाही ना. पण ही घटना घरी आहे.
सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून तो चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटे येतील. कारण साप म्हटलं तर कोणालाही भीती वाटते. या सापानेच कोणालाही मारहाण करणे म्हणजे जरा अतिच म्हणावे लागेल. हा साप चावला तर असं देखील तुम्हाला व्हिडिओ बघताना वाटेल. सुरुवातीला व्हिडिओ पाहून कोणालाही या तरुणाच्या हातामध्ये दोरी असल्याचे वाटेल. पण जेव्हा तो हातातील सापाला खाली फेकतो तेव्हा कळते की तो साप आहे.
नुकताच @crazyclipsonly या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये भररस्त्यात दोन जण रस्त्यावर भांडताना दिसत आहेत. एक तरुण सापाचा चाबूक म्हणून वापर करुन एका व्यक्तीला मारत असल्याचे दिसत आहे. समोरची व्यक्ती स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करतो. पण हा तरुण या व्यक्तीला मारतच सुटला आहे. तेवढ्यात पोलिसांची गाडी येते आणि हा तरुण आपल्या हातातील साप खाली टाकतो आणि रस्त्यावर झोपतो. साप सरपटत निघून जातो.
रस्त्यावर उभं राहून हे भांडण पाहणाऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये ही घटना शूट केली आणि सोशल मीडियावर शेअर केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कॅनडातल्या टोरंटो शहरातील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओतील तरुण ज्या सापाने समोरच्या व्यक्तीला मारहाण करत आहे तो त्याचा पाळीव साप आहे. या व्हिडिओला 1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.