Nandurbar News: अवकाळी पावसामुळे तीन हजार सहाशे हेक्टर क्षेत्रावर नुकसान

अवकाळी पावसामुळे तीन हजार सहाशे हेक्टर क्षेत्रावर नुकसान
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे तीन हजार सहाशे हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. या (Nandurbar News) नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण होणार आहेत. यानंतर शेतकऱ्यांला (farmer) सरकारकडून मदत मिळण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. (Tajya Batmya)

Nandurbar News
Kalyan News: पादचारी पुलावर पहाटे मारहाण करत लुटमार; कल्याण रेल्वे स्थानकावरील धक्कादायक घटना, व्हिडिओ आला समोर

नंदुरबार जिल्ह्यात सलग सात दिवस अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास पूर्णतः हिरावला गेला आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, कांदा, या पिकांसोबतच फळबागातील टरबूज, पपई, केळी यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आतापर्यंत तीन हजार सहाशे हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचे प्राथमिक माहिती समोर आले आहे.

Nandurbar News
Cyber Crime: सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; बनावट लेटरहेड पाठवून फसवणूक

क्षेत्र वाढण्याची शक्यता

नंदुरबार जिल्‍ह्यात अवकाळीने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवण्यात आलेले आहे. त्यामुळे सरकारने लवकर मदत करून शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढावा एवढी विनंती आता शेतकरी करू लागले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com