Genelia Deshmukh Turns At 36: देशमुखांची सून ‘लय भारी’! ४०० स्पर्धकांमधून जेनेलियाची चित्रपटासाठी निवड; असा होता अभिनेत्रीचा फिल्मी प्रवास

Genelia Deshmukh Career: अभिनेत्रीचा जन्म ५ ऑगस्ट १९८७ रोजी झाला असून ती ३६ व्या वर्षी पदार्पण करते. अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त आज आपण तिच्या करियर मधील काही रंजक किस्से जाणून घेणार आहोत.
Genelia Deshmukh Career
Genelia Deshmukh CareerSaam Tv

Happy birthday Genelia Deshmukh: अभिनेत्री जेनेलिया देशमुखने आज आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. लय भारी आणि वेड चित्रपटाच्या माध्यमातून जेनेलियाने मराठी सिनेसृष्टीत डेब्यू केलं. जेनेलियाच्या वाढदिवसानिमित्त आज आपण तिच्या करियर मधल्या काही रंजक किस्से जाणून घेणार आहोत.

जेनेलियाचे लग्नापूर्वी जेनेलिया डिसोझा हे नाव होतं. तिने आपल्या अभिनयाचा ठसा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, तमिळ, तेलूगु आणि मराठी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा तिने उमटवला. अभिनेत्रीचा जन्म ५ ऑगस्ट १९८७ रोजी झाला असून ती ३६ व्या वर्षी पदार्पण करते.

Genelia Deshmukh Career
HBD Kajol : १६ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये झळकणारी काजोल कोट्यवधींची मालकीण; पण शिक्षण अर्धवट राहिले म्हणून...

जेनेलियाने काही मोजक्याच चित्रपटात अभिनय केला असला तरी, तिने तिच्या कामाच्या माध्यमातून स्वत:ची छाप निर्माण केली. लग्नाआधी दोघांनीही काही चित्रपटात एकत्र काम देखील काम केले होते.

एकमेकांची ओळख झाल्यानंतरच त्यांनी एकमेकांना डेट करण्यासाठी सुरूवात केली. दोघांनीही एकमेकांना जवळपास ९ वर्ष एकत्र डेट केलं होतं. रितेशने लग्नाच्या काही दिवस आधी जेनेलियाला प्रपोज केला होते.

आणि ते सुद्धा एकदम रोमँटिक. रितेश- जिनीलियाने ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर अभिनेत्रीने अभिनयापासून दूर होत गेली.

लग्नानंतर जेनेलिया अभिनयक्षेत्रात का जास्त सक्रिय नाही, या प्रश्नाचं उत्तर अनेकदा रितेशलाही विचारण्यात आला होता. जेनेलियाच्या फिल्मी करियरची सुरूवात २००३मध्ये ‘तुझे मेरी कसम’मधून झाली होती. तिने तिच्या सिनेकारकिर्दित बॉलिवूडला जवळपास ३० हून चित्रपट दिले होते.

एका मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले होते, तिला ‘जाने तू या जाने ना’ ची ऑफर अनेक दिवसांआधी मिळाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा दीड वर्षानंतर तिला चित्रपटाची ऑफर मिळाली होती.

आणि त्याच चित्रपटाकरिता जवळपास ३०० ते ४०० मुलींनी ऑडिशन दिली होती. त्यावेळी कोणीच मिळत नसल्याने स्क्रीन टेस्ट पाहिली आणि तिला अदितीच्या भूमिकेसाठी फायनल करण्यात आलं.

Genelia Deshmukh Career
Nitin Desai's Funeral : नितीन देसाईंवर एनडी स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार

‘जाने तू या जाने ना’ मध्ये जेनेलियासोबत इम्रान खान देखील प्रमुख भूमिकेत होता. दोघांचीही ही आयकॉनिक रोमँटिक जोडी प्रेक्षकांना फारच भावली आहे. लग्नापूर्वी जेवढे जेनेलियाचे करियर चर्चेत होते, तेवढे लग्नानंतर तिचे करियर चर्चेत राहिले नाही.

मात्र अभिनेत्री डिसेंबर २०२२ मध्ये ‘वेड’ या सुपरहिट चित्रपटामुळे ती कमालीची चर्चेत आली होती. अभिनेत्री या चित्रपटात अस्खलित मराठी भाषा बोलली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७५ कोटींच्या आसपास गल्ला जमावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com