Ved OTT Release: चित्रपटगृहात प्रेक्षकांना ‘वेड’ लावल्यानंतर आता ओटीटीवरही रितेशची धूम; ‘वेड’च्या ओटीटी रिलीजची तारीख अन् वेळ ठरली

बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केल्यानंतर आता ‘वेड’ चित्रपट ओटीटीवरही आपली जादू दाखवण्यासाठी लवकरच सज्ज होत आहे.
Ved OTT Release
Ved OTT ReleaseInstagram @riteishd

Ved OTT Release: बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांनी चांगलीच कमाई केली. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ७४ कोटींची कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवरही आपली जादू दाखवण्यासाठी लवकरच सज्ज होत आहे. रॉमेंटिक ड्रामा असलेल्या चित्रपटाची भूरळ प्रेक्षकांवर आजही कायम आहे. चित्रपटातील गाण्यांनी देखील प्रेक्षकांना अक्षरश: ‘वेड’ लावलं.

Ved OTT Release
Jethalal And Babita Viral Video: जेठालालचा १४ वर्षांचा वनवास संपला; बबीताने आनंदाच्या भरात थेट... व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या उलटसुलट चर्चा

गेल्या महिन्यापर्यंत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७४ कोटींची कमाई केली होती. दमदार अभिनय, उत्तम कथा आणि तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अगदी सहजरित्या आपली धमक सर्वांना दाखवली. येत्या २८ एप्रिलला रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. १७ फेब्रुवारीला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशस्वी ५० दिवस पूर्ण केले होते. त्यावेळी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६०.६७ कोटींची कमाई केली होती.

‘वेड’ चित्रपटाच्या माध्यमातून रितेश देशमुखने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. पहिलाच चित्रपट इतका दमदार आणि हिट झाल्यामुळे सर्वच क्षेत्रातून रितेशवर कौतुकाची थाप पडत आहे. सोबतच या चित्रपटात रितेशने प्रमुख भूमिका साकारली असून चित्रपटात सहनिर्मिता म्हणून देखील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘वेड’ हा चित्रपट 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा तिसरा मराठी चित्रपट ठरला आहे. चित्रपटात रितेशसोबत पत्नी जिनिलीया देशमुख, अशोक सराफ आणि जिया शंकर प्रमुख भूमिकेत आहे. ‘वेड’ चित्रपटाचा 2019 मध्ये तेलुगु हिट मजिलीचा रिमेक आहे, ज्यात समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यने मुख्य भूमिका साकारली आहे.

Ved OTT Release
Bhediya 2-Stree 2 Movie: एकाच तिकिटात २ सिनेमे एकत्र... स्त्री आणि भेडिया येणार एकत्र.. हॉरर कॉमेडी सिनेमांची घोषणा

रितेशच्या सिनेकारकिर्दिबद्दल बोलायचे तर, त्याने इंडस्ट्रीत पदार्पण करून तब्बल दोन दशक पुर्ण झाले. २००३ मध्ये रितेशने जिनिलीयासोबत ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या माध्यमातून रितेश- जिनिलीयाने सिनेसृष्टीत पदार्पण केले. ही जोडी बॉलिवूडच्या क्यूट कपलपैकी एक आहे. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये एकल प्रमुख आणि सहाय्यक भूमिका केल्या.

रितेशने कॉमिक पात्रांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 2013 मध्ये आलेल्या ‘बालक पालक’ या मराठी चित्रपटातून तो निर्माता झाला. 2014 मध्ये त्याने ‘लय भारी’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत आपली हवा निर्माण केली आणि चित्रपटाला प्रचंड यश मिळाले.

निशिकांत कामत दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान आणि जिनिलिया यांनी कॅमिओ केला होता. सलमानच्या एन्ट्रीने रितेशच्या या दोन्ही चित्रपटांना जबरदस्त यश प्राप्त झाले. रितेशने याची सहनिर्मातीही केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com