Salman Khan: इतका सुपरस्टार असूनही सलमान राहतो 1BHK फ्लॅटमध्ये...; कास्टिंग डायरेक्टरने केला खुलासा

सलमान खान वांद्र्यातील ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटमध्ये राहतो. इतका सुपरस्टार असूनही सलमानला अतिशय साधे जीवन जगायला का आवडते ? याचा खुलासा कास्टिंग डायरेक्टरने केला आहे.
Salman Khan Home
Salman Khan HomeTwitter

Salman Khan Home: बॉलिवूडचा दबंग सलमान खान सर्वाधिक चर्चेत राहिलेलं नाव. दबंग खानने बॉलिवूडला त्याच्या फिल्मी कारकिर्दित बरेच हिट चित्रपट दिले आहेत. नेहमीच सलमानच्या हिट चित्रपटांची चर्चा सर्वत्र होते. सलमान खान वांद्र्यातील ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटमध्ये राहतो. इतका सुपरस्टार असूनही सलमानला अतिशय साधे जीवन जगायला आवडते.

Salman Khan Home
Raj Thackeray: राज ठाकरेंचं मिश्किल भाष्य, “आमची अवस्था दहावी नापास विद्यार्थ्यांसारखी झाली कारण...”

सलमानचा कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी सलमान बॉलिवूडमधील इतका महाग सेलिब्रिटी असूनही साधी राहणीमानमध्ये राहत असल्याने त्याचे कौतुक केले आहे. मुकेशने रणवीर अलाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. मुकेशने सलमानचं तोंडभरून या पॉडकास्टमध्ये कौतुक केलं आहे.

मुकेश त्या पॉडकास्टमध्ये म्हणतो, “सलमान असा माणूस आहे, तो प्रत्येकाच्या मदतीला धावून येतो. तो प्रत्येक गोष्टीत फारच प्रामाणिक आहे. लोक त्याच्या याच प्रामाणिकपणाचा गैरसमज करून घेतात. हीच समस्या आहे की जेव्हा तुम्ही काही प्रामाणिकपणे म्हणता, तेव्हा लोक त्याचा वेगळाच अर्थ काढतात.”

कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी सलमानला ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘ट्युबलाइट’ या चित्रपटांसाठी कास्ट केले होते. “सलमानला तुम्ही जर मध्यरात्री 3 वाजता कॉल केला, तरी तो तुमचा फोन उचलेल. प्रत्येकाला एवढ प्रेम मिळत नाही. अशा प्रेमासाठी देवाने खास व्यक्ती निवडलेली असते आणि सलमान खान त्यापैकीच एक आहे. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्ती सलमानवर प्रेमाचा वर्षाव करतो.” अशा शब्दांत मुकेशने सलमानचे कौतुक केले आहे.

सलमानच्या सिंपल राहणीमानामुळे दिग्दर्शकही थक्क झाले होते. सलमानच्या लाइफस्टाइलविषयी तो म्हणाला, “बर्‍याच कमी लोकांना माहित आहे की, सलमान खान जिथे राहतो ती जागा 1BHK अपार्टमेंट एवढीच आहे. त्यात एक सोफा, डायनिंग टेबल, एक छोटी जागा आहे जिथे तो लोकांसोबत संवाद साधतो. एक छोटी जिम आणि एक खोली आहे.”

“सलमान खान बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्यांपैकी एक आहे. तो नेहमीच अतिशय साधे जीवन जगतो. त्याला फॅन्सी ब्रँड आवडत नाहीत. तो सर्व काही खातो, तो सामान्य जीवन जगतो. ही त्याची कलात्मक प्रक्रिया नाही. तो तसाच आहे.” पुढे मुकेश म्हणतात. मी गेल्या १५ वर्षांपासून सलमानसोबत बोलतो, त्याच्या राहणीमानात अद्याप कोणताही फरक पडलेला नाही.

सलमान आणि शाहरुख खानचा ‘पठान’ या अॅक्शन चित्रपटातील कॅमिओमध्ये दिसले होते. तो लवकरच फरहाद सामजीच्या ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये दिसणार आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ 21 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सलमान ‘टायगर 3’ मध्ये कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीसोबत दिसणार आहे. ‘टायगर 3’ यावर्षी 10 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com