
Asit Kumar Modi's Reaction: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या १५ वर्षांपासून मालिका प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. मालिकेतील अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यातीलच एक जोडी म्हणजे मि. अँड मिसेस सोढी. मिसेस सोढीच्या भूमिकेत असलेल्या जेनिफर मिस्त्रीने मालिकेचे प्रोजेक्ट मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि निर्मात्यांवर लैंगिक छळाचा आरोप करत पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. आता या प्रकरणावर मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित कुमार मोदींनी अभिनेत्रीने केलेले सर्व आरोप फेटाळत हे सर्व आरोप खोटे असल्याची माहिती आहे. जेनिफर निर्मात्यांची प्रतिमा बदनाम मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचं असित कुमार यांनी सांगितलं. सोबतच, जेनिफरने शो सोडला नसून तिला शोमधून बाहेर काढण्यात आल्याची निर्मात्यांनी दिली.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित कुमार मोदींनी ई-टाईम्ससोबत साधलेल्या संवादात सांगितले, “या आरोपांना काहीच तथ्य नसून हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसून जेनिफर माझी प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करते. ही माझी प्रतिक्रिया खरी असून माहिती सांगताना मी काहीही खोटं सांगत नाही.”
सोबत पुढे संवाद साधताना असित कुमार मोदी म्हणतात, “माझं नेचर सर्वांनाच माहित आहे, माझ्या आयुष्यात मी कसा आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. तिला शो मधून आणि टीममधून देखील काढण्यात आलं असून दिग्दर्शकांनी आणि मालिकेच्या टीमने तिला हा शो सोडण्यास सांगितले. मी खोटे आरोप करत नसून लवकरात लवकर पुराव्या सकट आरोप सिद्ध करेल. माझे प्रोडक्शन लवकरच सर्व पुरावे आणि कागदपत्र जमा करेल.” अशी माहिती देखील यावेळी निर्मात्यांनी दिली आहे.
तर आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, मालिकेतील भिडे मास्तर म्हणजेच मंदार चांदवडकरने सुद्धा या प्रकरणासंबंधित प्रतिक्रिया दिली आहे. मंदार म्हणतो, “जेनिफर मिस्त्रीने असं का केलं याबद्दल मला काहीच माहित नाही. त्यांच्यात असं काय घडलं याची ही मला कल्पना नाही. हे पुरुष-अराजकीय स्थान नाही. मालिकेच्या सेटचा शो म्हणजे, ताजं वातावरणं असलेलं एक आनंदी ठिकाण आहे, जर असं नसतं तर हा शो इतक्या वर्ष चाललाच नसता.”
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.