WhatsApp New Update : व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी गुड न्युज ! नव्या फीचर्समुळे ओळख लपवता येणार...

WhatsApp To Replace Phone Numbers With Usernames: मेटा-मालकीचे व्हॉट्सअॅप वापरकर्ते नाव सेट करण्यासाठी एका विशिष्ट गोष्टीवर काम करत आहे
WhatsApp New Update
WhatsApp New UpdateSaam tv

WhatsApp New Features : WhatsApp च्या वापरकर्ते जगभरात पसरले आहे. समोरच्या व्यक्तीला न भेटता आपण त्याला आपल्याला त्याला फाईल्स शेअरिंगपासून ते व्हिडिओ कॉलच्या माध्यामातून बोलता येते

मेटा-मालकीचे व्हॉट्सअॅप वापरकर्ते नाव सेट करण्यासाठी एका विशिष्ट गोष्टीवर काम करत आहे, जे वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यांसाठी two factor authentication साठी नाव निवडण्याची परवानगी देते. येणाऱ्या नव्या WhatsApp च्या फीचर्समध्ये हे जोडता येऊ शकते अशी अपेक्षा आहे.

WhatsApp New Update
WhatsApp Digi locker : चलन कट होण्याचे टेन्शन नॉट ! Driving License, RC सतत सोबत ठेवण्याची गरज नाही, WhatsApp च्या एका क्लिकवरुन होईल काम...

1. बीटा व्हर्जनवर नवे फीचर्स

WABetaInfo च्या अहवालानुसार "Google Play Store वरून Android 2.23.11.15 अद्यतन केले आहे. यामुळे कॉल्स (Calls), स्टेटस आणि चॅट्स टॅब हे पर्याय स्क्रीनच्या खालच्या बाजूला दिसतील. अशी माहीती WABetaInfo यांनी आपल्या रिपोर्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे.

2. ग्रुप सेटिंगमध्येही बदल

WABetaInfo नुसार, WhatsApp अॅप सेटिंग्जमध्ये वापरकर्ता आपले नाव व फंक्शन जोडण्याचा सक्रियपणे प्रयत्न करत आहे. वापरकर्ते व्हॉट्सअॅप सेटिंग्ज मेनूमध्ये जाऊन आणि प्रोफाइल पर्याय निवडून या वैशिष्ट्यात प्रवेश करू शकतात.

3. यूजनर नेम कसे ठेवाल ?

एखादा वापरकर्ता त्याचे नाव वगळून केवळ त्यांच्या फोन नंबरद्वारे स्वतःची ओळख दाखवू शकतो. त्याऐवजी, त्यांच्याकडे two factor authentication असणे गरजेचे आहे.

अहवालात असा दावा करण्यात आला आहे की व्हॉट्सअॅपचे वापरकर्ते लवकरच चॅट बॉक्समध्ये त्यांचे पसंतीचे वापरकर्ता नाव टाइप करून इतरांशी चर्चा सुरू करू शकतील आणि त्यांचे फोन नंबर (Number) जाणून घेण्याची गरजही भासणार नाही.

WhatsApp New Update
WhatsApp Chat Lock Feature: व्हॉट्सअ‍ॅपच नव अपडेट ! आता चॅट ही करता येणार लॉक, कसे कराल? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप

4. कधी होणार लाँच

WhatsApp वापरकर्तानावे कशी कार्य करतील याचे अचूक तपशील अद्याप अज्ञात असले तरी, वापरकर्ता नाव वापरून सुरू झालेल्या संभाषणांना अॅपच्या मजबूत एन्ड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे संरक्षित केले जाईल असा अंदाज आहे. WhatsApp हमी दिली आहे की वापरकर्त्याची माहीती ही गोपनीयता आणि डेटा सुरक्षिततेला नेहमीच महत्त्व दिले जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com