Dhule : प्रशासनाच्या दबावतंत्रामुळे दोन ST कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका; एकाचा मृत्यू !

ST प्रशासनाच्या दबावतंत्राचा धसका घेऊन धुळे व जळगाव या दोन ठिकाणच्या आंदोलकांना हृदयविकाराचे झटके (Heart Attack) आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Dhule : प्रशासनाच्या दबावतंत्रामुळे दोन ST कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका; एकाचा मृत्यू !
Dhule : प्रशासनाच्या दबावतंत्रामुळे दोन ST कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका; एकाचा मृत्यू !SaamTV

मुंबई : राज्यभरात सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप ST workers strike दिवसेंदिवस चिघळतच आहे. मात्र या संपावरती अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही. ST सेवा बंद असल्यामुळे सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत तर विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु झालेत. मात्र शाळेत जाण्यासाठी बसेस नाहीत त्यामुळे कोरोना नंतर (After Corona) एवढ्या दिवसांनी उघडलेल्या शाळेतही विद्यार्थ्यांना जाता य़ेत नसल्याचे चित्र एका बाजूला आहे. तर दुसऱीकडे एसटी कर्मचाऱ्यांचे (ST Staff) देखील मोठ्या प्रमाणात हाल सुरु आहेत. (Heart attack to 2 ST employees; Death of one)

ST महामंडळाने (ST Corporation) निलंबनाचा धडाका सुरुच ठेवला आहे. अशातच काल धुळे आगारातून पोलीस संरक्षणात (Under Police Protection) बस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विभाग नियंत्रकांच्या आदेशानुसार धुळे आगारातून काही बसेस काल बाहेर देखील सोडण्यात आल्या होत्या. एकिकडे संपावरती तोडगा नाही दुसरीकडे निलंबनाची कारवाई आणि आता नवीन भरती केलेल्या आणि खासगी चालकांकडून केली जाणारी ST वाहतूक यामुळे आंदोलक चांगलेच दबावात आले आहेत.

याच ST प्रशासनाच्या दबावतंत्राचा धसका घेऊन धुळे व जळगाव या दोन ठिकाणच्या आंदोलकांना हृदयविकाराचे झटके (Heart Attack) आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धुळ्यातील 40 वर्षीय चालक एसटी आंदोलकांना हृदयविकाराचा झटका आंदोलकाला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर पाचोरा आगारातील दिलीप महाजन यांचा धुळ्यात उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला आहे.

Dhule : प्रशासनाच्या दबावतंत्रामुळे दोन ST कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका; एकाचा मृत्यू !
America: ख्रिसमस परेडमध्ये घुसली भरधाव कार, 20 जणांना चिरडले! (पहा Video)

दरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलक दिलीप महाजन (Protesters Dilip Mahajan) यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास दिला नकार दिला आहे. तसेच अजून किती जणांना आपला जीव गमवावा लागणार?; मग या प्रशासनाला जाग येणार असा प्रश्न एसटी आंदोलकांचे कुटुंबीय विचारत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com