
विश्वभूषण लिमये, सोलापूर
Solapur News: आपल्या दमदार डान्स आणि दिलखेच अदांनी संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणाऱ्या गौतमी पाटील (Gautami Patil) अडचणीत आली आहे. गौतमी पाटील तिच्या डान्स शोमुळेच (Gautami Patil Dance Show) अडचणीत आली आहे. याप्रकरणी तिच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोलापूरातल्या बार्शीमध्ये गौतमीचा शो झाला होता. या शोच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या आयोजकानेच गौतमी पाटीलविरोधातच पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शीमध्ये गौतमी पाटीलचा शो झाला. बार्शीतील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड मित्र मंडळ या संस्थेने शुक्रवारी 12 मे रोजी गौतमी पाटीलच्या शोचे आयोजन केले होते. या शोचे आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी गौतमी आणि तिचा सहकारी केतन मारणे आणि सेक्रेटरी विनोद यांच्याविरोधात बार्शी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी गौतमी आणि तिच्या सहकाऱ्याने माझी फसवणूक करुन मानसिक त्रास दिल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
बार्शीत गौतमी पाटीलचा शो झाला खरा. या शोचे सात वाजता आयोजन करण्यात आले होते. गौतमी वेळवर न आल्यामुळे शो रात्री पावणे दहाच्याच्या सुमारास सुरु झाला. यावेळी गौतमी एकाच गाण्यावर नाचली नाही तोवर बार्शी पोलिसांनी शो बंद पाडला. 10 वाजल्यानंतर खबरदारी म्हणून पोलिसांनी हा शो बंद पाडला. गौतमीचा शो पाहण्यासाठी सहा वाजल्यापासून लोकांनी गर्दी केली होती. फक्त गौतमी एकाच गाण्यावर नाचून निघून गेल्यामुळे बार्शीकर नाराज झाले.
एकतर गौतमी या कार्यक्रमाला उशिरा आली त्यात तिने शोसाठी ठरलेल्या मानधनापेक्षा मला वेठीस धरुन जास्त पैसे घेतले, असा आरोप तक्रारदार राजेंद्र गायकवाड यांनी केला आहे. तसंच, नियोजित शोला उशिरा येऊन माझी बदनामी करण्याच्या हेतूने फसवणूकही केल्याचे त्यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. या तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, बार्शीतल्या या शोप्रकरणी आधीच पोलिसांनी आयोजक राजेंद्र गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी दिलेली नसताना देखील त्यांनी या शोचे आयोजन केल्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यांच्याविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम 188, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135, 37(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.