Yavatmal News: आठ वर्षीय मुलासह गळफास घेत आईची आत्‍महत्‍या

आठ वर्षीय मुलासह गळफास घेत आईची आत्‍महत्‍या
Yavatmal News
Yavatmal NewsSaam tv

यवतमाळ : आठ वर्षीय चिमुकल्या मुलासह आईने गळफास लावून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना (Yavatmal News) यवतमाळ शहरातील अशोकनगर परिसरात उघडकीस आली. यात घटनेमुळे परिसर हादरला आहे. (Live Marathi News)

Yavatmal News
Narhari Zirwal Dance Video: झिरवाळ जोमात पब्लिक कोमात; थेट पत्नीला खांद्यावर घेऊन केला भन्नाट डान्स, पाहा VIDEO

रेश्मा वंडकर (वय ३८) आणि पूर्वेश वंडकर (वय ८) असे मृत आई व मुलाचे नाव आहे. दोघेही सिंहगड रोड कोल्हेवाडी पुणे येथे मुळ रहिवासी असून ते यवतमाळमधील अंबिका नगर येथे वास्‍तव्‍यास होते. आज सकाळच्‍या सुमारास रेश्‍मा व मुलगा पुर्वेश हे दोघे गळफास घेतल्‍याच्‍या अवस्‍थेत आढळून आले.

Yavatmal News
Jalgaon News: वाढदिवसीच मुलीचा दुर्देवी मृत्‍यू; घरात तयारी सुरू असताना झाला घात

सदर घटनेबाबत परिसरातील नागरीकांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिस घटनास्‍थळी दाखल होवून पंचनामा करत तपास सुरू केला आहे. मात्र रेश्‍मा वंडकर यांनी आत्‍महत्‍या का केली? याबाबत स्‍पष्‍ट माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com