Railways Issues Helpline Numbers: ओडिशा रेल्वे अपघातानंतर रेल्वेकडून हेल्पलाईन नंबर जारी, जखमी नातेवाईकांबद्दल करु शकता चौकशी

Odisha Train Accident: या अपघातामध्ये मृत्यू आणि जखमी झालेल्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.
odisha train accident
odisha train accidentSaam Tv

Odisha Railway Accident: ओडिशाच्या (Odisha) बालासोरमध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मोठा रेल्वे अपघात झाला. हा देशातील सर्वात मोठा रेल्वे अपघात आहे. या भीषण रेल्वे अपघातामध्ये आतापर्यंत 233 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक जण जखमी आहेत. या रेल्वे अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. घटनास्थळावर लष्कर आणि वायूदलाचे जवान मदतकार्य करत आहे. या अपघातामध्ये मृत्यू आणि जखमी झालेल्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. अशामध्ये रेल्वे प्रशासनाने हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत.

odisha train accident
Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघाताचा परिणाम, रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलं; या ट्रेन रद्द तर यांच्या मार्गात बदल

कोरोमंडल एक्स्प्रेसने मालगाडीला जोरदार धडक दिली. ही एक्स्प्रेस चेन्नईला जात होती. या अपघातादरम्यान या एक्स्प्रेसचे इंजिन मालगाडीवर चढले. त्यानंतर या एक्स्प्रेसच्या पाठीमागचे डबे रुळावरुन घसरुन दुसऱ्या रुळावर पडले. त्याचवेळी या रुळावरुन हावडा-बंगळुरु एक्स्प्रेस येत होती. या एक्स्प्रेसने कोरोमंडल एक्स्प्रेसच्या डब्याला धडक दिली. त्यानंतर या एक्स्प्रेसचे डबे देखील रुळावरुन घसरले. या भीषण अपघातामध्ये तीन्ही ट्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये मोठ्याप्रमाणात जीवितहानी झाली आहे.

odisha train accident
Odisha Train Accident News : ओडिशा ट्रेन अपघातातील मृतांचा आकडा 233 वर, 900 हून अधिक प्रवासी जखमी

ओडिशामध्ये ज्या ट्रेनचा अपघात झाला आहे. त्या ट्रेनमधून ज्यांनी प्रवास केला त्यांचे नातेवाईक आणि कुटुंबीय चिंतेत आले आहेत. त्यांच्या आपल्या माणसांबाबत काहीच माहिती मिळत नाही आहे. अशामध्ये जर तुमचे नातेवाईक किंवा परिवारातील सदस्य ट्रेन अपघातामध्ये अडकले असतील तर तुमच्यासाठी रेल्वेकडून हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आले आहेत. या हेल्पलाइन नंबरवर कॉल करुन तुम्ही तुमच्या नातेवाईकांबद्दल चौकशी करुन माहिती जाणून घेऊ शकतात. या अपघातात जे जखमी झाले आहेत त्यांची सध्या परिस्थिती काय आहे याबद्दल देखील तुम्ही चौकशी करु शकतात.

odisha train accident
Odisha Train Accident: मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचा लोकार्पण सोहळा रद्द; ओडिशा अपघातानंतर रेल्वे मंत्रालयाचा निर्णय

अपघातातील जखमींशी संपर्क साधण्यासाठी रेल्वे हेल्पलाइन नंबर -

भोपाळ - 0755 4001609

हरदा - 9752460088

बीना - 07580 222052

इटारसी - 07572 241920

वाराणसी -5422-503814

मुंबई - 0222-5280005

विजयवाडा - 0866 2576924

राजमुंदरी - 08832420541

समलकोट - 7780741268

नेल्लोर - 08612342028

ओंगोल - 7815909489

गुडूर - 08624250795

मुख्यालय वाणिज्यिक नियंत्रण हेल्पलाइन नंबर-

रेल्वे - 88516

बीएसएनएल : 040-27788516

एसएलओ हेल्पलाइन नंबर -

बीएसएनएल- 7382629990

ऑटो - 65601

आरजेवाई हेल्पलाइन नंबर -

बीएसएनएल नंबर 0883 - 2420541

ऑटो फोन नंबर - 65395

टीडीडी हेल्प डेस्क -

रेल्वे - 64701

बीएसएनएल नंबर - 08818-226162

BZA हेल्प डेस्क

रेलवे - 67055

बीएसएनएल - 0866-2576924

बीपीपी हेल्प डेस्क -

रेल्वे - 63203

बीएसएनएल नंबर - 08643-222178

ओजीएल हेल्प डेस्क -

रेलवे सीयूजी नंबर - 7815909489

एनएलआर हेल्प डेस्क -

बीएसएनएल - 0861-2342028

रेल्वे - 61308

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com