
Aishwarya Sharma Injured In KKK13: ‘गम है किसी के प्यार में’ फेम पाखी उर्फ ऐश्वर्या शर्माने ‘खतरों के खिलाडी १३’मध्ये एन्ट्री केली आहे. गेल्या आठवड्यातच ‘खतरों के खिलाडी १३’ मधील सर्वच स्पर्धक शूटिंगसाठी दक्षिण अफ्रिकेला रवाना झाले आहेत. अशातच नुकतीच शूटिंगला सुरूवात झाली असून ऐश्वर्या शर्माला शूटिंग दरम्यान स्टंट करताना तिच्या हाताला दुखापत झाली आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर स्टोरी ठेवत चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली आहे. निर्माता रोहित शेट्टीच्या या शोमधील सर्वच स्पर्धक कमालीची धमाल मस्ती करताना दिसत आहे, सध्या त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ऐश्वर्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या हाताला दुखापत झाल्याचा फोटो शेअर केला आहे, एका टास्क दरम्यान तिच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती तिने दिली आहे. अभिनेत्री ऐश्वर्या शर्माची स्टोरी पाहून चाहते चिंतेत पडले आहेत. हा फोटो पाहिल्यानंतर युजर्स अभिनेत्रीला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
ऐश्वर्याची मैत्रीण आशना किशोर हिने तिला प्रोत्साहित केले असून तिची स्टोरी पाहून तिला म्हणते, “आधीच खूप काही गोष्टींचा सामना करत आहे, जर मी तिथे तुझ्या जवळ असते, तर तुझी संपूर्ण मी काळजी घेतली असती. फक्त तुला सांगते, तू सर्वात मजबूत आहेस आणि मला तुझा खूप अभिमान आहे, तुझ्यावर प्रेम आहे बाळा.” यावर ऐश्वर्याने म्हणते, ‘मला माहित आहे की तू नेहमी माझ्या हृदयात असतेस.’ (Entertainment News)
या महिन्याच्या सुरूवातीलाच ऐश्वर्याने ‘गम है किसी के प्यार में’ मालिकेतून बाहेर पडत असल्याची माहिती दिली होती. तिच्या अशा अचानक एक्झिटने सर्वांनाच फार मोठा धक्का बसला होता. हा शो मी सोडत असून, शो सोबतच माझ्या सर्व गोष्टी संपुष्टात आल्या आहेत. ‘खतरों के खिलाडी १३’ बद्दल बोलायचे तर, या शो मधील सर्वच कलाकार शूटिंगसोबतच परदेशातील सुट्टीचा आनंद लुटत आहेत. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.