Salman Khan: ‘मी अशा पोकळ धमक्यांना घाबरत नाही...’ सलमान मिळत असलेल्या सुरक्षेवर जरा स्पष्टच बोलला

सलमानला धमकीचा मेल आल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत आणखी वाढ केली आहे. अशातच या संपूर्ण प्रकरणावर सलमानच्या प्रतिक्रियेबद्दल एका जवळच्या मित्राने माहिती दिली आहे.
Salman Khan- Lawrence Bishnoi
Salman Khan- Lawrence BishnoiSaam TV

Salman Khan Security: बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या कमालीचा चर्चेत आला आहे. सलमान खानला जीवे मारण्याची धमकी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने दिली होती. त्यानंतर रोहित गर्ग नावाच्या एका तरूणाने सलमान खानच्या जवळच्या सहकाऱ्याला ई मेल पाठवून अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सलमानला धमकीचा मेल आल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत आणखी वाढ केली आहे. अशातच या संपूर्ण प्रकरणावर सलमानच्या प्रतिक्रियेबद्दल एका जवळच्या मित्राने माहिती दिली आहे.

Salman Khan- Lawrence Bishnoi
Actor Rani Mukerji: 'या' एका घटनेमुळे राणी मुखर्जी इच्छा नसतानाही अभिनय क्षेत्रात आली

एका इंग्रजी संकेतस्थळाच्या रिपोर्टनुसार, सलमानच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले, “सलमानला मिळालेल्या धमक्यांचा कोणताही फरक पडलेला नाही. तो ही धमकी फारच सामान्य पद्धतीने घेतो. तसेच त्याच्या फॅमिलीला देखील त्रास होऊ नये म्हणून कदाचित तो तसं भासवत आहे. एकत्र राहणाऱ्या या कुटुंबाची खास गोष्ट म्हणजे ही भीती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. सलमानचे वडील सलीम खानही खूप शांत दिसत आहेत. पण ते रात्री झोपू शकत नाही. ” अशी माहिती त्या व्यक्तीने दिली आहे.

सलमानच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, “सलमानला या मिळत असलेल्या सुरक्षेच्या तो विरोधात आहे. सलमानला वाटतं की, असं करुन आपण त्याला धमकवलेल्या त्या व्यक्तीवर जास्त लक्ष देत आहोत. भीतीपोटी तुम्ही जितके ती गोष्ट वाढवाल तितका त्याचा हेतू यशस्वी होईल. तसेच सलमानला नेहमीच मोकळेपणाने जगायला आवडतं. जेव्हा जे व्हायचं असेल तेव्हा ते होईल. मात्र कौटुंबिक दबावामुळे त्याने आपले सर्व प्लॅन्स कॅन्सल केले आहेत. पण तरीही ईदला रिलीज होणाऱ्या ‘किसी का भाई किसी की जान’ या आगामी चित्रपटाच्या कामाच्या शेड्यूलमध्ये कोणताही बदल झालेला नाही.”

Salman Khan- Lawrence Bishnoi
Natu Natu Viral Video : 'नाटू-नाटू' गाण्यावर माणसंच नाही तर कार देखील थिरकल्या; पहा भन्नाट व्हिडिओ

सलमानचा जवळचा मित्र प्रशांत गुंजाळकर याला शनिवारी धमकीचा ई-मेल पाठवला होता. सलमानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याचं नाव रोहित गर्ग असल्याची माहिती मिळाली. सलमान खानच्या टीमने संशयित आरोपी रोहित गर्ग, गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत आणखी वाढ केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com