IIFA Award 2023 Win In Ved Film
IIFA Award 2023 Win In Ved FilmSaam Tv

IIFA Award 2023: आयफामध्ये बॉलिवूडला मराठी चित्रपटानं लावलं ‘वेड’, ठरला बेस्ट रिजनल सिनेमा...

IIFA Award 2023 In Marathi Film: आयफा २०२३ मध्ये बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केलेल्या ‘वेड’ या मराठमोळ्या चित्रपटाचा गौरव करण्यात आला आहे.

IIFA Award 2023 Win In Ved Film: २६ आणि २७ मे रोजी अबुधाबी येथे आयफा २०२३ (International Indian Film Festival Awards) हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडमधील जवळपास सर्वच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सेलिब्रिटींच्या फॅशनने आणि त्यांच्या शानदार डान्सने कार्यक्रमाला चार चाँद लावले. या पुरस्कार सोहळ्यात दरवर्षी बॉलिवूड चित्रपटांनाच विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येते. यावेळी मात्र एक वेगळाच विक्रम भारतीय प्रेक्षकांना दिसला. बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केलेल्या ‘वेड’ या मराठमोळ्या चित्रपटाला गौरविण्यात आले.

IIFA Award 2023 Win In Ved Film
Madhurani Prabhulkar Share A Post: अरुंधतीने शेअर 'आई'चा रियल लाईफ स्ट्रगल; मुलीला वेळ देऊ शकत नसल्याने व्यक्त केली खंत

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात अनेक बॉलिवूड चित्रपटांचा गौरव झाला. पण प्रादेशिक चित्रपटसृष्टीत उत्तम कामगिरी करणाऱ्या ‘वेड’ या मराठमोळ्या चित्रपटाचा देखील यावेळी गौरव करण्यात आला. चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ७४ कोटींची कमाई केली आहे. मराठी सिनेसृष्टीतला हा तिसरा चित्रपट ठरला असून यापूर्वी ‘सैराट’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला जमावला होता.

IIFA Award 2023 Win In Ved Film
Raghav-Parineeti Destination Wedding: राघव- परिणीतीला लगीनघाई, कुटुंबीयांसोबत गाठलं राजस्थान...

प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ या मराठमोळ्या चित्रपटाला सन्मानित करण्यात आलं. आयफा २०२३ मध्ये Outstanding Achievement in Regional Cinema हा पुरस्कार देत दिग्दर्शक रितेश देशमुख आणि निर्माती जेनिलिया देशमुखचा गौरव करण्यात आला.

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ७४ कोटींची कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवरही आपली जादू दाखवण्यासाठी लवकरच सज्ज होत आहे. रॉमेंटिक ड्रामा असलेल्या चित्रपटाची भूरळ प्रेक्षकांवर आजही कायम आहे. चित्रपटातील गाण्यांनी देखील प्रेक्षकांना अक्षरश: ‘वेड’ लावलं. २८ एप्रिलला रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटीवर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.

IIFA Award 2023 Win In Ved Film
Karishma-Sanjay Kapoor Dinner Date: Ex-Husband सोबत स्पॉट झाली करिष्मा कपूर; नेटकऱ्यांना आठवले संजय कपूरवर केले गंभीर आरोप

‘वेड’ चित्रपटाच्या माध्यमातून रितेश देशमुखने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. पहिलाच चित्रपट इतका दमदार आणि हिट झाल्यामुळे सर्वच क्षेत्रातून रितेशवर कौतुकाची थाप पडत आहे. सोबतच या चित्रपटात रितेशने प्रमुख भूमिका साकारली असून चित्रपटात सहनिर्मिता म्हणून देखील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘वेड’ हा चित्रपट 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा तिसरा मराठी चित्रपट ठरला आहे. चित्रपटात रितेशसोबत पत्नी जिनिलीया देशमुख, अशोक सराफ आणि जिया शंकर प्रमुख भूमिकेत आहे. ‘वेड’ चित्रपटाचा 2019 मध्ये तेलुगु हिट मजिलीचा रिमेक आहे, ज्यात समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यने मुख्य भूमिका साकारली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com